
तर त्या जुन्या गझला ऐकताना ‘सुनते है के मिल जाती है हर चीज दुआ से’ ही गझल सापडली. ही गझल मी साधारण १९९० च्या सुमाराला पहिल्यांदा ऐकली होती. सिटी चौकातील बरीच दुकाने पालथी घातल्यावर एका ठिकाणी मिळाली होती. अधून मधून ऐकायचो. नंतर ती डिजीटल कन्वर्ट करताना ऐकली होती. आणि परवा अचानक हाती लागली. गेल्या काही दिवसांपासून याच गझलने दिवस सुरु होतो आणि मावळतो.
मूळ आग्र्याचे, पण नंतर फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या राणा अकबराबादी यांची ही सुंदर गझल आहे. त्यांच्याबद्दल वाचताना या गझलचा थोडा इतिहास पण कळाला. शायराला कोणती गोष्ट प्रेरणा देऊन जाईल सांगता येत नाही. त्यांना दोन मुले होती. त्यातला धाकटा शाळेत असताना मित्रांसोबत घराजवळच्या कालव्यात पोहायला गेला. त्यात बुडून मरण पावला. मुलाच्या मृत्यूने व्यथित झालेल्या राणा अकबराबादी यांनी लिखाणच सोडल्यात जमा होते. तो गेल्या दिवसापासून ते एक शेर कायम म्हणत. सुनते है के मिल जाती है हर चीज दुआसे..
एक रोज तुम्हे मांग के देखेंगे खुदासे..
काही वर्षे गेली. दु:ख थोडेसे कमी झाली. राणा
अकबराबादी यांनी पुन्हा लिखाण सुरु केले. नंतर कधी तरी ही गझल पूर्ण झाली. ही पार्श्वभूमी
वाचल्यावर गझल आणखी तीव्रतेने टोचते.
सुनते है की मिल जाती हैं हर चीज दुआसे
एक रोज तुम्हे मांग के देखेंगे खुदासे /
तुम सामने बैठे हो तो है कैफ की बारिश
वो दिन भी थे जब आग बरसती थी घटासे/
ऐ दिल तू उन्हे देख कर कुछ ऐसे तडपना
आ जाये हंसी उनको जो बैठे है खफासे /
दुनिया भी मिली है गम-ए-दुनिया भी मिला
है
वो क्यू नही मिलता जिसे मांगा था खुदासे
/
जब कुछ न मिला हाथ दुआओं को उठाकर
फिर हाथ उठानेही पडे, हमको दुआ से /
आईनेमें वो अपनी अदा देख रहे है
मर जाये की जी जाये कोई उनकी बलासे/
उम्मीद-ए-वफा उनसे फकत एक भरम है
वो कत्ल भी करते है तो करते है अदासे /
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा