मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

गंधर्वाचे झाड...

















काही माणसं आपल्या आयुष्यात यायला हवी होती, त्यांना भेटता यायला हवं होतं असं अनेकदा वाटतं. पंडित कुमार गंधर्व हे त्यातलंच एक नाव. आमच्या पिढीला त्यांचं गाणं प्रत्यक्ष मैफलीत कधीच ऐकता आलं नाही, याची कायम रुखरुख वाटत राहते. ज्यांनी त्यांना ऐकलंय त्यांच्याकडून ऐकताना आपण काय मिस केलं हे कायम जाणवत राहते. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे हे फोटोत दिसणारं झाड. खरं तर ती वेल आहे. नागवेल. विड्याच्या पानांची.
या रोपाची कहाणी जेव्हा मला समजली तेव्हापासून मला त्याबद्दल उत्सुकता होती. कारण कुमार गंधर्वांच्या अंगणातील हे झाड आहे. पंडित नाथराव नेरळकर आणि कुमार गंधर्व यांची अनेक वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी कुमार गंधर्वांच्या अंगणात असलेल्या नागवेलीचे रोपटे नाथरावांनी औरंगाबादला आणले. तिथून ते आले निरखी कुटुंबियांकडे. तीच वेल निरखींच्या बंगल्यात अगदी दर्शनी भागात आहे. निखिल निरखीने अनेकदा या झाडाबद्दल सांगितल्यानंतर एकदा जाऊन ते झाड पाहून आलो. त्याची पाने पण आणली. गंधर्वाचेच झाड ते...

२ टिप्पण्या: